स्वभाव–विभाव (पुस्तक-परीक्षण, ले. आनंद नाडकर्णी)
माणूस जसा वागतो तसा तो का वागतो, ह्या प्र नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच मानवी वर्तन (आणि प्राणि-वर्तनसुद्धा) समजून घेण्याच्या शास्त्राचा, म्हणजेच मानसशास्त्राचा जन्म झाला आहे. मानवी मन हे आजही माणसाला पडलेले कोडे आहे व ते सोडविण्याचे अनेक मार्ग व पद्धती मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत. आजही मानसशास्त्र का निवडले असा प्र न जर विद्यार्थ्याला विचारला तर …